मनसे सोडून शिवसेनेत सहभागी होण्याबाबत मलाही विचारलं होतं आणि आयुष्यभर पुरतील एवढे पैसे देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट मुंबई महापालिकेतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केला आहे.
मनसेचे सहा नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेनेने मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत, या संपूर्ण पक्षांतराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी लाचलुचपत खात्याला पत्र लिहून केली आहे.