नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (ना सुप्र) च्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांवर कारवाई करून अधिकारी बिल्डरांना जमीन देण्याचा घाट घालत आहेत. यापार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक पवित्रा घेत ‘बडग्या आंदोलन’ कर नासुप्रचा निषेध केला.
नासुप्रचे अधिकारी बिल्डर, राजकारणी यांच्याशी हात मिळवणी भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केला आहे.
मनसेच्या सैनिकांनी नागपूर सुधार प्रण्यासच्या अधिकऱ्याचा बडग्या बनवून बुधवारी सुधार प्रन्यासवर धडक मोर्चा काढला .हा मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.
मनसेच्या आंदोलकांनी नासुप्रच्या अधिकाऱ्याकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात घोषणाबाजी केली. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात शिष्ट मंडळाने सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. मनसेच्या या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.