Published On : Sun, Nov 10th, 2019

कामठीत मोहम्मद पैगंबर जयंती उत्सवात साजरी

Advertisement

नारे तकबिर अल्ला हो अकबर’ च्या गजरात दुमदुमले कामठी शहर

ईद ए मिलादुनब्बी निमित्त निघाली वाद्य मुक्त शांती यात्रा मिरवणूक

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 94,100/-
Gold 22 KT 87,500/-
Silver / Kg - 92,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विशव शांतीचे प्रणेते मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती जशने ईद ए मिलादुननबी या उत्सवानिमित्त आज 10 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता मौलाना मो अली जोहर मंच येथून मरकजी सिरतूननबी कमिटी च्या वतीने वाद्य मुक्त भव्य शांती मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीचे उदघाटन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले .

याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, शोएब असद, मो आबीद भाई ताजी, इकबाल भाई ताजी, नियाज अहमद, बाबू भाई भाटी, लाला खंडे लवाल , नौशाद सिद्दीकी, आदी मान्यवर उपस्थित होते. या मिरावणुकीतून अनुयायांनि काढलेल्या ‘नारे तकबिर अल्ला हो अकबर’ च्या गजरात कामठी शहर दुमदुमले .

या मिरवणूकीतून मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या विशवशांतीचा संदेश देण्यात आला .तर ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत असता चौका चौकात ठिकठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने मिरवनूकीतील अनुयायांना स्वागत करीत पाणी पाऊच, मिठाई आदी वितरण करण्यात आले.

ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गानी भ्रमण केल्यानंतर मौलाना मो अली जोहर मंच येथे समापन करण्यात आले .त्यानंतर विश्व शांती भारताला जगात योग्यस्थान मिळावे तसेच भारतात बंधू भाव , एकता राहावी यासाठी समस्त मुस्लिम बांधव एकत्र प्रार्थना केली तसेच मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकीत धार्मिक प्रवचन करण्यात आले .व दुपारी 2 वाजता परचंम कुशाई करीत या महाआनंदाणे या उत्सवाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत मरकजी सिरतुनब्बी कमिटी चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थित होते.

तर ही मिरवणूक यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी डीसीपी निलोत्पल, एसीपी राजरतन बन्सोड यांच्या मार्गदर्शनार्थ जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, नवीन कामठी पोलीस स्टेशन साज वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement