Published On : Tue, Jun 18th, 2024

नागपुरात मान्सूनची हजेरी;मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा

Advertisement

नागपूर: जून महिना सुरु झाला तरी अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज नागपुरात हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यंदा उन्हाचा पारा चांगलाच चढला होता. उष्णतेच्या लाटेचा नागपूर जिल्ह्याला फटका बसला आहे.

Advertisement

जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंश से.चा टप्पा देखील ओलांडला. दरम्यान, सोमवारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासापर्यंत पावसाचा जोर कायम होता. सर्वत्र पावसाने हजेरी लावली.

वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.