Advertisement
मुंबई : राज्यात आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या घोषणा या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनात निवडणुका डोळ्यांसमोर घोषणांचा पाऊस होऊ शकतो. तर विरोधक अनेक मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
शेतकरी कर्जमाफी, दुधाला कमी भाव, नीट परीक्षा रद्द, बोगस बियाणे, ज्यादा भावात बियाणे विक्री, बेरोजगारी,अटल सेतू भेगा,शेतकरीला मदत न करने,शेतकऱ्यांना पीक कर्ज न देने , कायदा सुव्यवस्था, पोलिस भरती रद्द,परीक्षा घोळ,पेपर फुटी, पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण महागाईसह अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार आहे.