मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहेत. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या रंगणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यावर विरोधकांनी आत्मविश्वास गमावला असून आपल्या कामातून आपण त्यांना उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला.
राज्यात लोकशाहीच शिल्लक राहिली नसल्याची टीका विरोधकांनी केली. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग पेटणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे महत्त्वाचे पद अजित पवार यांच्या बंडामुळे काँग्रेसचे ताब्यात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मान्य केल्याचे दिसते.
दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे सामान्य जनता, शेतकरी, महागाई, महिलांचे प्रश्न मार्गी लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.