Advertisement
नागपूर : प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनच्या हालचाली सुरू असून अनुकूल परिस्थितीमुळे येत्या १९ मे रोजी अंदमानात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. साधारणपणे मॉन्सून अंदमानात २२ मेच्या आसपास दाखल होणार आहे.आगामी काळात कसल्याही अडथळ्याविना मॉन्सूनची प्रगती कायम राहिल्यास, येत्या एक जूनपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी विदर्भात आगमन अपेक्षित आहे.विदर्भात मॉन्सूनच्या सरासरी आगमनाची तारीख १५ जून आहे. त्यामुळे या तारखेच्या आसपास यावेळी मॉन्सून दाखल होईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.