Published On : Wed, May 9th, 2018

‘मदर्स डे’ला होणार मातांचा सत्कार

Mother's Day Honors

नागपूर: जागतिक मदर्स डेचे निमित्त साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने परिस्थितीवर मात करून मुलांना घडविणाऱ्या तसेच उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही ‘आई’ म्हणून आपली जबाबदारी तेवढ्याच समर्थपणे पार पडणाऱ्या मातांचा सत्कार करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘आई’ला समर्पित हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे यांनी पत्रपरिषदेत दिली.

पत्रपरिषदेला क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, तमन्ना इव्हेंटचे आसीफ खान, नित्यानंद तिवारी उपस्थित होते. ह्या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन रविवार १३ मे रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेसोबत तमन्ना इव्हेंट ॲण्ड एन्टरटेंमेन्ट यांच्या सहकार्याने पब्लिक रिलेशन ब्रैण्ड बौण्डिंग आयडियाच कंपनी संगीतमय कार्यक्रमाची प्रस्तुती करणार असल्याचे सभापती नागेश सहारे यांनी सांगितले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गीत कार्यक्रमात प्रख्यात पार्श्वगायक बाजीराव मस्तानी व पद्‌मावत फेम फरहान साबरी यांच्यासह राईजिंग स्टार-२ चे जैद अली, नागपूर शहरातील प्रतिभावंत गायिका वॉईस ऑफ इंडिया फेम सृष्टी बार्लेवार आणि श्रेया खराबे सहभागी होतील. अशी माहिती तमन्ना इव्हेंटस्‌चे आसीफ खान यांनी दिली.

सत्कार कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यक्रम नि:शुल्क असून प्रवेश पत्रिकांकरिता आसीफ खान (मो. ९३७३८०४८८१) ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी केले आहे.

Advertisement