नागपूर (मौदा): समाजकारणात नव्याने प्रवेशलेल्या श्री श्री फाऊंडेशनने आरोग्य शिबिरांचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो काय, हे तपासून राजकारणापलिकडे जाऊन समाजकारण करावे. तसेच आरोग्य शिबिरांसोबत प्रत्येक गावातील एका घरी 2 वृक्ष लावण्याची विनंती नागरिकांना करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मौदा येथे केले.
श्री श्री फाऊंडेशनतर्फे नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन मौदा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात करण्यात आले होते. प्रचंड गर्दी करीत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. 1900 रुग्णांची नि:शुल्क तपासणी आणि औषधोपचार या रुग्णांना देण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, नगर पंचायतच्या सभापती भारती सोमनाथे, राजू सोमनाथे, शकुंतला हटवार, श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे, मुकेश अग‘वाल, टेकचंद सावरकर, मुन्ना चेलसानी, चांगोजी तिजारे, हरीश जैन, सावरकर, अनिल निधान, योगेश वाडीभस्मे, नीळकंठ भोयर, रमेश चिकटे,सुनील रोडे, रमेश कुंभलकर, गुड्डू चाकूरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- औषधोपचार घेतले नाही तर दोन दिवसांचा आजार जीव घेऊ शकतो. त्यामुळे आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वीज-पाणी-रस्ते याप्रमाणेच आरोग्य सेवाही महत्त्वाची बाब झाली आहे. केंद्र शासनाने आयुष्यमान योजना आणली आहे. त्या योजनेचा फायदा गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. यासोबतच प्रत्येक घरी दोन वृक्ष लागवड होईल, यासाठी नागरिकांना आवाहन करून या चळवळीत लोकसहभाग घ्यावा. तसेच जलसंधारणाची कामे अधिक कशी करता येतील याचा प्रयत्न करा, असेही पालकमंत्री म्हणाले.
या शिबिरात 236 दंत रुग्णांची, 120 रुग्णांची रक्त तपासणी, 108 रुग्णांचा ईसीजी, डोळ्यांची 612 रुग्णांची तर किडणी, हार्ट लिव्हर याची 750 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यासोबतच मधुमेहाची 250 जणांची तपासणी करून शिबिरातील सर्व रुग्णांना नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे बीदवाक्य स्वीकारून समाजसेवेचा विडा श्री श्री फाऊंडेशनने उचलला आहे. विविध रुग्णांच्या तपासण्यासाठी 18 काऊंटर तयार करण्यात आले होते. या सर्व काऊंटर रुग्णांची गर्दी होती.
शिबिरात मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, दंत विभागातर्फे डॉ. वैभव कारेमोरे, नेत्र विभागातर्फे डॉ. मदान, आशा हॉस्पिटल कामठीतर्फे सौरभ अगवाल यांची चमू कार्यरत होती. याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभागाची चमू, डॉ. सुनील फुडके यांचाही शिबिरात सकिय सहभाग होता. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी किशोर कानतोडे, महेश बोंडे, कुणाल ढाले, प्रितम लोहासारवा, हर्षल हिंगणीकर, विकास धारपुडे, सचिन शर्मा, बापू सोनवणे,कपिल गायधने आदीनी प्रयत्न केले.