Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी २ फेब्रुवारीला

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
Advertisement

नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आली आहे. महाअंतिम फेरीचा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी ११.३० वाजता होईल. केंद्रीय मंत्री ना. श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले, सचिव जयप्रकाशजी गुप्ता, महिला आघाडी अध्यक्ष प्रगती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती असेल.

७ ते १२ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी स्पर्धेत नागपुरातील ६ विभागांतील ५८३ भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्व भजनी मंडळींद्वारे श्रीकृष्ण भक्तीचा जागर करण्यात आला. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत विजेत्यांना २० भव्य रोख पारितोषिक देण्यात येईल. ज्येष्ठ वयोगटात १२ पुरस्कार आहेत. सात रोख पुरस्कार आणि पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील. खासदार भजन स्पर्धेत नागपुरातील सहभागी ५८३ भजनी मंडळांना प्रत्येकी १५००/- रुपये मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे. खासदार भजन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अमोल ठाकरे, विश्वनाथ कुंभलकर, माया हाडे, सपना सागुळले, श्वेता निकम, श्रधा पाठक, रेखा निमजे, विजय येरणे, दर्शना नखाते, सुजाता कथोटे, अभिजित कठाले, श्री. ढबले, अतुल सगुळले आदी पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.

Advertisement
Advertisement