Published On : Mon, Aug 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

खासदार राहुल गांधी संसदेत परतले ; विरोधकांकडून जल्लोष

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाली असून ते आज संसदेत परतले आहे. याबाबतची अधिसूचनाही लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांची दोन वर्षांची शिक्षा रद्द केली. यानंतरच त्यांना खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाडमधून निवडणूक जिंकली होती.

मोदी आडनावाच्या बदनामीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांची खासदारकी गेली होती. तसेच पुढील सात वर्षे ते निवडणूकही लढविता येणार नव्हती. यावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली होती. न्यायालयाने या पेक्षा कमी शिक्षा देखील करता आली असती, असे म्हटले.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कोणती कारणे दिली आहेत. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहिले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान राहुल गांधी यांना खासदारकी मिळाल्यामुळे विरोधकांनी जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement