Published On : Mon, Jan 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भ स्तरीय खो-खो स्पर्धा १२ ते १६ जानेवारी दरम्यान

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत विदर्भ स्तरीय वरिष्ठ गट व जिल्हास्तरीय बाल गट खो-खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १६ जानेवारी या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर कोराडी रोड येथे या स्पर्धा घेण्यात येतील.

या स्पर्धेकरीता वरिष्ठ गटात विदर्भातून पुरुषांच्या व महिलांचे एकूण ५० संघ तर बाल गटात मुले व मुलांच्या एकूण २४ संघांनी सहभाग निश्चित केला आहे. वरिष्ठ गटात विजयी संघाला ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस व आकर्षक चषक, उपविजेता संघाला ३० हजार रुपयांचे रोख बक्षीस व आकर्षक चषक आणि तृतीय स्थान प्राप्त करणार्‍या संघाला २५ हजार रुपये रोख बक्षीस व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय चवथ्या क्रमांकापासून तर आठवे क्रमांक प्राप्त करणार्‍या चमूंना प्रत्येकी ४ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक गटात वैयक्तिक बक्षिसाच्या स्वरुपात उत्कृष्ट संरक्षक आणि उत्कृष्ट आक्रमक म्हणून प्रत्येकी ३५०० रुपये तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूला ४ हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात येईल.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बाल गटात विजयी संघाला २१ हजार रुपये रोख बक्षीस व आकर्षक चषक, उपविजेता संघाला १५ हजार रुपये रोख आणि तृतीय स्थानावरील संघाला ११ हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात येईल. वैयक्तिक बक्षिसाच्या स्वरुपात उत्कृष्ट संरक्षक, उत्कृष्ट आक्रमक व सर्वोत्कृष्ट खेळाडूला प्रत्येकी १५०० रुपये रोख देण्यात येईल. याशिवाय प्रत्येक सामन्याच्या उत्कृष्ट खेळाडूला आकर्षक बक्षीस देण्यात येईल.

बाहेर गावाहून येणार्‍या चमूची निवास व्यवस्था व भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी, सहसंयोजक डॉ. पद्माकर चारमोडे, श्री. राजेश तुमसरे, श्री. पंकज बोकडे, नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Advertisement