Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या २ ते ५ ऑक्टोबरपर्यंत अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून होणाऱ्या सभांमध्ये सरकारच्या धोरणांवर आणि राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारावर सरकारवर कडाडून हल्ला करणार आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांची २ ऑक्टोबरला श्रीगोंदा येथे सभा, ३ ऑक्टोबरला अहमदनगर शहर, राहुरी, ४ ऑक्टोबर रोजी अकोले, कोपरगाव, ५ ऑक्टोबर रोजी पैठण, रांजणगाव शेणपुंजी, गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात सभा, महाविदयालयीन विदयार्थ्यांशी संवाद आणि प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा व मेळावा होणार आहे.