Published On : Wed, Aug 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

लिपिक टंकलेखक आणि करसहाय्यक पदासाठी झाली होती परीक्षा
Advertisement

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गट-क सेवा परीक्षा २०२१ मधील लिपिक टंकलेखक आणि करसहाय्यक पदासाठी झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.उमेदवारांना क्रमवारीसह त्यांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. न्यायिक प्रकरणांमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर केल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे.

अशा उमेदवारांनी १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

टंकलेखक भरतीमध्ये मराठी संवर्गातून लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस आणि इंग्रजी संवर्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वजरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर महिलांमध्ये अनुक्रमे राधिका गोलहार आणि ज्योती काटे यांनी बाजी मारली आहे.आयोगाने लिपीक टंकलेखक पदासाठी मराठी संवर्गात एक हजार ६२ तर इंग्रजी संवर्गासाठी १६ उमेदवारांची अंतिम शिफारस यादी घोषित केली आहे.

आयोगाच्या वतीने कर सहायक संवर्गाचाही अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल विजय जेंगठे यांनी प्रथम तर महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एमपीएससीने २२५ उमेदवारांची शिफारस जाहीर केली आहे.

Advertisement
Advertisement