Advertisement
नागपूर: महावितरण कंपनीचे कुही येथील सहाय्यक श्री प्रदीप सिडाम हे थकबाकी वसुलीसाठी कुही येथील पेसने चौक परिसरातील कमलेश उर्फ बबलू लिमजे यांच्या घरी वीज बिलाची थकबाकी राहिल्याने वीज खंडित करण्यासाठी गेले असता त्यांना लिमजे यांनी शिवीगाळ करून जीवे मारायची धमकी दिली.
या प्रकरणी कुही पोलिसांनी श्री सिडाम यांच्या फिर्यादीवरून लिमजे यांच्या विरोधात ३५३, १८६, २९४, ५०४, ५०६ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.