रामटेक:-रामटेक येथील बालकविताकार प्रशांत जांभुळकर यांच्या कवितेचे कविसंमेलनातील कविकट्यावर सादरीकरण झाले.यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रशांत जांभुळकर यांच्या ‘लाख मोलाची गोष्ट’ या रचनेची निवड करण्यात आली होती.
राज्यातील कवि या मध्ये सहभागी झाले होते. कवियत्री विद्या देवधर, राजन लाखे यांच्या उपस्थितीत कवितेचे सादरीकरण करण्यांत आले.उत्कृष्ट सादरीकरणाबद्धल प्रशांत जांभुळकर यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यांत आला, जेष्ठ कवी अशोक नायगांवकर, कवी अरूण म्हात्रे यांनी रचनेचे कौतुक केले.
कवी प्रशांत जांभुळकर यांचे गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने कवी पवन कामडी,राजेश राठोड, योगेश वासाडे,राजकुमार पचारे,प्रभाकर जांभुळकर, विदर्भ वतन साप्ताहिक चे संपादक गोपाल कडूकर,राजेश पारधी,विनोद,उमाकांत जांभुळकर,विकास गणवीर,प्रभाकर ठाकरे, शिक्षक व मित्र परीवाराचडून अभिनंदन करण्यांत येत आहे.