Published On : Tue, Jan 24th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महावितरण चे शटडाऊन: गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र २८ जानेवारी रोजी ६ तास राहणार बंद

शहरातील ८ जलकुंभांचा पाणीपुरवठा शनिवारी राहील बाधित....
Advertisement

नागपूर: महावितरण (MSEDCL) यांनी 33 KV गोधनी  फिडर जी १३२ के वी  मानकापूर अप्पर सब स्टेशन वरून येते त्यावर काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी , २८ जानेवारी (शनिवार) रोजी ६ तासांचे (सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत)  शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. महावितरण च्या ह्या ६ तासाच्या शटडाऊन मुळे नागपूर महानगरपालिका आणि OCW चे  गोधनी पेंच- ४ हे जलशुद्धीकरण केंद्रावरून पम्पिंग  देखील शनिवारी , २८ जानेवारी , रोजी  सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत बंद राहणार आहे.

त्यामुळे शहरातीतलं  ८ जलकुंभांचा.. नारा  जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ ,  म्हाळगी नगर  जलकुंभ (हनुमान नगर झोन)  पाणीपुरवठा ,  २८ जानेवारी (शनिवार) रोजी बाधित राहील. 

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाणीपुरवठा दि २९ जानेवारी ला त्या त्या भागातील वेळापत्रकानुसार  सुरळीत होईल. 

ह्या महावितरण शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे… 

 

या ६ तास शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे ८ जलकुंभ पुढीलप्रमाणे:

नारा जलकुंभनिर्मल सोसायटीआराधना कॉलोनीशंभू नगरशिवगिरी लेआऊटनूरी कॉलोनीतवक्कल सोसायटीआर्य नगरओम नगरनारागाववेलकम सोसायटीदेवी नगरप्रीति सोसायटी  

नारी/जरीपटका जलकुंभभीम चौकहुडको कॉलोनी, नागार्जुना कॉलोनीकस्तुरबा नगरकुकरेजा नगरमार्टिन नगरविश्वास नगरख़ुशी नगर, LIG कॉलोनी, MIG कॉलोनीसुगत नगरकबीर नगरकपिल नगरकामगार नगररमाई नगरदीक्षित नगरसन्याल नगरचैतन्य नगरसहयोग नगर मानव नगरशेंडे नगरराजगृह नगरलहानुजी नगर

लक्ष्मी नगर नवे जलकुंभ: सुरेंद्र नगरदेव नगरसावरकर नगर, विवेकानंद नगरविकास नगरहिंदुस्तान कॉलोनीप्रगती नगरगजानन नगरसहकार्य नगरसमर्थ नगर (पूर्व व पश्चिम)प्रशांत नगरसंपूर्ण अजनी भागउरुवेला कॉलोनी, राहुल नगरनवजीवन कॉलोनीछत्रपती नगर पॉवर हाऊस जवळकानफाडे नगरविश्राम नगर, संताजी नगरनरगुंदकर लेआऊट, LIC कॉलोनीरामकृष्ण नगर व इतर

धंतोली जलकुंभ: धंतोली, काँग्रेस नगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम.

ओंकार नगर १ व २ जलकुंभ: रामटेके नगररहाटे नगर टोलीअभय नगरगजानन नगरजोगी नगरपार्वती नगरभीम नगरजय भीम नगरजयवंत नगरशताब्दी नगरकुंजीलाल पेठहावरा पेठबालाजी नगरचंद्र नगरनालंदा नगररामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट

म्हाळगी नगर जलकुंभ: सन्मार्ग नगरअन्नपूर्णा नगरनवे नेहरू नगर स्लमविघ्नहर्ता नगरसंतोषी नगरसरस्वती नगरशिवशक्ती नगरजानकी नगरन्यू अमर नगरविज्ञान नगरगुरुकुंज नगरम्हाळगी नगरगजानन नगरप्रेरणा नगरसूर्योदय नगरमहालक्ष्मी नगरमहात्मा गांधी नगरअष्टविनायक कॉलोनी, राधाकृष्ण नगरशिवाजी नगरमां भगवती नगर

श्री नगर जलकुंभ: श्री नगरसुंदरबन८५प्लॉटसुयोग नगरसाकेत नगरअरविंद सोसायटीबोरकुटे लेआऊट, PMG सोसायटीविजयानंद सोसायटी, संताजी सोसायटीडोबी नगरम्हाडा कॉलोनीई.

नालंदा नगर जलकुंभ: जय भीम नगर, पार्वती नगर, ज्ञानेश्वर नगर, कैलास नगर, बालाजी नगर, चंद्र नगर, नाईक नगर, मित्र नगर, गजानन नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट, नालंदा नगर, बँक कॉलोनी

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899. 

Advertisement