Published On : Tue, Apr 24th, 2018

महावितरणकडून राज्यात विक्रमी २३ हजार ७०० मेगावॅट वीजेचा पुरवठा

Mahavitaran Logo Marathi

मुंबई:- महावितरणने आज सोमवार दि. 23 एप्रिल 2018 रोजी राज्यात 23 हजार 700 मेगावॅट वीजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे वीजेच्या एवढ्या विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले.

राज्यात महावितरणच्या कार्यक्षेत्रात आज 23 हजार 700 मेगावॅट एवढ्या वीजेची कमाल मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने वीजेची ही संपूर्ण मागणी यशस्वीपणे पूर्ण केली. राज्यात वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जातात. त्यामुळे एवढया मोठ्या प्रमाणातील वीजेच्या मागणीचा पुरवठा महावितरणला पूर्ण करता येणे शक्य झाले आहे.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज मुंबईची वीजेची मागणी 3 हजार 375 मेगावॅट एवढी नोंदविण्यात आली तर संपूर्ण राज्याची वीजेची कमाल मागणी 23 हजार 700 एवढी नोंदविण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा करताना वीज वितरण यंत्रणेत कोणताही बिघाड न होता वीज पुरवठा झाला.

Advertisement