Published On : Fri, Apr 6th, 2018

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल

Advertisement


नागपूर: महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण आठवडयातील सातही दिवस व 24 तासकरण्यासाठी महावितरणने टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. या क्रमांकापैकी 1800-200-3435 या क्रमांकात बदल करण्यात आलाअसून या क्रमांकाऐवजी आता ग्राहकांना 1800-102-3435 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

महावितरणच्या वतीने ग्राहकांना 19120, 1800-102-3435 व 1800-233-3435 असे तीन टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेआहेत. ग्राहकांना या टोलफ्री क्रमांकाद्वारे महावितरणच्या विविध योजनांची माहिती मिळवता येईल व तक्रारींचे निराकरणही करता येईल.

Advertisement

Advertisement
Today's Rate
Wed 11 Dec. 2024
Gold 24 KT 78,100/-
Gold 22 KT 72,600/-
Silver / Kg 94,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above