नवी दिल्ली : संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केले. यावरून विरोधकांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत काहीही नाही. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीय. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे,असे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक मांडले जात असताना काँग्रेसवर हल्लाबोल केला.
तुमचा आग्रह होता की, संयुक्त संसदीय समिती बनवा. आमची काँग्रेससारखी समिती नाही, आमची लोकशाहीप्रधान समिती आहे. आमची समिती डोकं चालवते, काँग्रेसच्या जमान्यात कमिटी शिक्का मारायच्या. आमची कमिटी चर्चा करते. चर्चेच्या आधारावर विचार आणि परिवर्तन करते. परिवर्तन स्वीकारायच नसेल, तर मग कमिटी कशाला हवी?” असा सवाल अमित शाह यांनी विचारला.
माननीय सदस्याने जो पॉइंट ऑफ ऑर्डर उचलला आहे, भारत सरकारच्या कॅबिनेटने या विषयी विधेयक मंजूर करुन सभागृहासमोर मांडलं. सभापती तुमच्याद्वारे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीला दिलं. विरोधी पक्षाचा हा आग्रह होता.
समितीने यावर सुविचार करुन आपल मत प्रगट केलं. ते जे मत प्रगट केलं, ते पुन्हा कॅबिनेटसमोर आले. कमिटीचे जे सल्ले होते, ते भारत सरकारच्य कॅबिनेटने स्वीकारले आणि सुधारणा म्हणून ते सल्ले किरेन रिज्जू यांनी मांडल्या. यात काही पॉइंट ऑफ ऑर्डर मला वाटत नाही, असेही अमित शहा म्हणाले.