Published On : Mon, Oct 16th, 2017

प्रतापनगर माटे चौक येथे मध्य रात्री हत्या

Advertisement

नागपूर : नागपुरात सूटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून मयत व्यक्तीची मुलगी आणि जावई बेपत्ता आहेत.

मानसिंग शिव असं मयताचं नाव असून ते 40 ते 45 वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता आहे. मानसिंग यांची मुलगी आणि जावई बेपत्ता असून परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार त्या दोघांनीच ही हत्या केल्याचा दाट संशय आहे. हत्या प्रकरणात कुटुंबातील इतर सदस्यांच्या समावेशाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे ती सूटकेस काल संध्याकाळीच खरेदी करण्यात आली होती.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काय आहे प्रकरण?

नागपुरातील माटे चौकात मध्यरात्री 2.30 वाजता एक तरुण आणि तरुणी एक मोठी बॅग घेऊन जात होते. या दोघांनी दुर्गानगर स्टॅण्डवर रिक्षा पकडली आणि चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितलं. परंतु बॅगचं वजन आणि दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रिक्षाचालकाने त्याबाबत विचारणा केली.

घाबरल्याने तरुण-तरुणी बॅग तिथेच टाकून माटे चौकातून पोबारा केला. यानंतर रिक्षाचालकाने राणा प्रतापनगर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पहाटे तीनच्या सुमारास पोलिस स्टेशनमध्ये बॅग आणून ती उघडली असता, त्यात पुरुषाचा मृतदेह आढळला.

Advertisement
Advertisement