मुंबई महाराष्ट्राचीच. ती कुणाच्या बापाची नाही. त्यावर कुणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही. हे सभागृह म्हणून कर्नाटकच्या मंत्र्यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो – देवेंद्र फडणवीस
मुंबईवर दावा सांगणारं कर्नाटकच्या मंत्र्यांचं विधान चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी गृहमंत्र्यांसमोर ठरलेल्या गोष्टींचं उल्लंघन करणं दोन राज्यांच्या द्विपक्षीय संबंधांसाठी योग्य नसल्याचं त्यांना दाखवून दिलं जाईल. केंद्रीय गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या जातील. कर्नाटकच्या बोलघेवड्या लोकांना तंबी द्यायला हवी अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली जाईल – देवेंद्र फडणवीस
अमित शाहांच्या बैठकीत काही गोष्टी ठरल्या होत्या. असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ताकीद कर्नाटकच्या मंत्र्यांना द्यावी – अजित पवारांची राज्य सरकारकडे मागणी
कर्नाटक सरकारच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करावा कर्नाटकचे लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकचाच भाग असल्याचं सांगून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे – अजित पवार