मुंबई :शहरातील गेटवे ऑफ इंडियाजवळ मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सांयकाळी घडली. या दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला.या मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या परिवारास प्रत्येकी दोन लाखांची रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींमध्ये सात पुरुष, चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. बोटीमधील पर्यटकांना गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटा येथे नेण्यात येत होते.
अशी घडली घटना?
गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या बोटीची जहाजाला धडक बसली गेली. दुर्घटनेनंतर बोटीमधील सर्वजण आक्रोश करू लागले. बोट उलटी झाल्याने समुद्रात बुडालेल्या व्यक्तींचे तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यामध्ये जवळजवळ 101 व्यक्तींना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. पण 13 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला.