नागपूर : म. न. पा. प्रवर्तन विभागा मार्फत आज दिनांक. ,२२/०२/२०२३ रोजी हनुमान नगर झोन क्र. ३ अंतर्गत तुकडोजी पुतळा ते क्रीडा चौक ते रेशिमबाग चौक ते तिरंगा चौक ते रेशिमबाग चौक ते क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा ते अजनी पोलीस स्टेशन पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली, ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे ३६ अतिक्रमण हटविले व १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
नेहरू नगर झोन क्र. ५ अंतर्गत नेहरू नगर ते भांडे प्लॉट चौक ते दिघोरी चौक ते गुरुदेव नगर चौक ते गजाननगर चौक ते सक्करदरा चौक ते भांडे प्लॉट चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली, ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे २८ अतिक्रमण हटविले व २ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
मंगळवारी झोन क्र. १० अंतर्गत मंगळवारी बाजार येथे अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली, ज्या मध्ये ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे २८ अतिक्रमण हटविले व १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. त्या नंतर तक्रारी नुसार सदर येथे अवैध पद्धतीनें बांधण्यात आलेले अंदाजे ५०० चौ.फु. चे टिनाचे शेड तोडण्यात आले.
ही कारवाई श्री. अशोक पाटील उपायुक्त अतिक्रमण व संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक यांचे मार्गदर्शनात भास्कर माळवे, विनोद कोकार्डे क. अभियंता व अतिक्रमण पथका द्वारे करण्यात आली.