८ एप्रिल पासून मोहिम
नागपूर : नागपूरात लसीकरण अभियानाला गती प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आता विशिष्ट नागरिकांसाठी जे आपल्या रोजगारासाठी घराच्या बाहेर सदैव असतात त्यांचा लसीकरण करण्यावर अधिक जोर देणार आहे. मनपाचे लक्ष्य यांचा लसीकरण करुन त्यांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचविण्याचा आहे कारण हे “सुपर स्प्रेडर” ठरु शकतात. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी मंजूरी प्रदान केली आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, मनपाच्या वतीने ८ एप्रिल रोजी सगळया वाहन चालकांचा लसीकरण केले जाईल. यामध्ये ऑटो रिक्शा चालक, सायकल रिक्शा चालक, ई-रिक्शा चालक, काली-पीली टॅक्सी चालक, ओला-उबेर सारख्या कंपनी चे चालक व अन्य खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये काम करणा-या चालकांना शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयात लस दिली जाईल. वाहन चालक आपल्यासोबत आपल्या परिवाराचे पात्र व्यक्तिंना सुध्दा लसीकरणासाठी आणू शकतात. तसेच १२ एप्रिल ला पार्सलची डिलीवरी करणा-या नागरिकांचे लसीकरण सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये होणार आहे. यामध्ये फुड डिलीवरी करणारे, पार्सल डिलीवरी करणारे सर्व नागरिकांचा समावेश आहे.
त्यानंतर १४ एप्रिल ला भाजीपाला विकणारे, फळ विकणारे आणि दूधाची डिलीवरी करणा-या नागरिकांना लस दिली जाईल. तसेच १६ एप्रिल ला कामगार आणि हॉकर्स, १८ एप्रिल ला मीडिया मध्ये काम करणारे कर्मचारी व पत्रकार, २० एप्रिल ला व्यापारी व मेडिकल दूकानदार, २२ एप्रिल ला रेस्टारेंट व हॉटेल कर्मचारी तसेच २४ एप्रिल रोजी सेल्स व मार्केटींग चे काम करणा-या नागरिकांचे लसीकरण केल्या जाईल. या सर्व नागरिकांनी आपल्यासोबत आधार कार्ड किंवा पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेंस सोबत आण्याचे आहे.
दर बुधवारी महिलांना लसीकरण
श्री. शर्मा यांनी सांगितले की समाजात महिलांची टक्केवारी ५० टक्के आहे. त्यांनासुध्दा लसीकरण करणे गरजेचे आहे. मनपाव्दारे प्रत्येक बुधवारी महिलांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जाईल. या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मोठया प्रमाणात लसीकरण करणे हा आहे.