नागपूर: मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव मिळावे या मागणीकरीता नामांतर आंदोलन ४ ऑगस्ट,१९७८ रोजी झाले.
या नामांतर आंदोलनात जे भिमसैनिक शहीद झाले, त्या सर्व भीम सैनिकांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ नागपूर नगरीच्या उपमहापौर मनीषा धावडे, सभापती कर व कर आकारणी श्री. महेन्द्र धनविजय, जलप्रदाय समिती सभापती श्री. संदीप गवई, नगरसेवक सर्वश्री. ॲड धर्मपाल मेश्राम, नागेश साहारे, विजय चुटेले, माजी आमदार डॉ. मिलीन्द माने यांनी इंन्दोरा १० नंबर पुल, कामठी रोड स्थित शहीद भिमसैनिक नामांतर स्मारकाला पुष्पचक्र व पुष्प अर्पण करुन नामांतर आंदोलनातील शहीद भिम सैनिकांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण केली.
या प्रसंगी अशोक मेंढे, राजेश हाथीबेड, पांडूरंग जगताप, अशोक कोल्हटकर तसेच बहुसंख्य भिमसैनिक व विविध संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.