पाचपावली रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालयाची पाहणी
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमाने रुग्णांसाठी ऑक्सीजन खाटांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सतत होत आहे. ऑक्सीजन प्लांट सुध्दा लावण्यात येत आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रकाश भोयर यांनी इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर व पाचपावली सूतिकागृहाची पाहणी केली. रुग्णसेवेसाठी कुठलीही आर्थिक कमतरता भासू देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. भोयर म्हणाले, मनपाचे प्रयत्न आहे की नागरिकांना ऑक्सीजन बेडसची कमतरता पडू नये, यासाठी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयामध्ये, मनपाच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन लाईन व काही रुग्णालयात ऑक्सीजन प्लांटची व्यवस्थासुध्दा करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, व्यवस्था उभारण्यासाठी मनपातर्फे आर्थिक मदत केली जाईल. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या प्रयत्नातून हे साकार होत आहे. प्रशासनसुध्दा मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या नेतृत्वात अहोरात्र काम करीत आहे. केन्द्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी व विधानसभेचे विरोधी पक्ष नेता श्री. देवेन्द्र फडणवीस सुध्दा मनपाला या संकटात मदत करीत आहे.
यावेळी त्यांच्या समवेत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्री. राजेन्द्र सोनकुसरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते.