कन्हान : – नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, कॉग्रेस, प्रहार महाआघाडी चे योगेंद्र रंगारी हे उपाध्यक्ष पद्दी ६ विरूध्द १२ मतानी निवड झाली तर स्विकृत सदस्य पद्दी कॉग्रेसचे नरेश बर्वे यांची निवड करण्यात आली.
गुरूवार (दि.२०) ला नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, कॉग्रेस, प्रहार महाआघाडीचे योगेंद्र झिटुजी रंगारी यांचा तर भाजप चे सौ सुषमा संजय चोपकर या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना गट नेता मोनिका पौनिकर व कॉग्रेस गटनेता मनिष भिवगडे यांनी कॉग्रेस योगेंद्र रंगारी यांचे नावे व्हीप जारी केला. नगराध्यक्षासह शिवसेना ०४, कॉग्रेस ०७, प्रहार जनशक्ती ०१ असे १२ मते तर भाजप गटनेता राजेंद्र शेंदरे यांनी सुषमा चोपकर यांचे नावे व्हीप जारी केल्याने ०६ मते मिळाल्याने उपाध्यक्ष पद्दी ६ विरूध्द १२ मतानी कॉग्रेसचे योगेंद्र रंगारी यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी पिठाशीन अधिकारी नगराध्यक्षा सौ करूणाताई आष्टणकर यांच्या आदेशाने मुख्याधिकारी सतिश गावंडे हयानी उपाध्यक्ष म्हणुन योगेंद्र रंगारी यांची निवड झाल्याची घोषणा केली.
तसेच स्विकृत सदस्या करिता मा रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपुर यांचे कडे कॉग्रेस कडुन नरेश कचरूजी बर्वे, भाजप कडुन शंकर चिंतामण चंहादे व शिवसेना व्दारे शैलेष दिवे यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यात शिवसेना ०४ संख्या बळ कमी असल्याने व भाजप चे शंकर चंहादे यांचा तांत्रीक तुटी मुळे अर्ज रद्द करण्यात आल्याने एकमेव स्विकृत सदस्य म्हणुन कॉग्रेस कडुन नरेश कचरूजी बर्वे यांची निवड करण्यात आली.