कामठी : -कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावा मुळे शासनाद्वारे नागरिकांना सॅनिटायझर लावण्याचे, साबणाने हात वारंवार हात धुण्याचे, आणि मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे,परंतु कामठी शहरातील दयनीय परिस्थिती पाहता येथील प्रत्येक कुटूंबियांना ५०० मि लि लिटर सॅनिटायझर,४ साबण,आणि ५ मास्क ची हेल्थ किट देण्यात यावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने तहसीलदार अरविंद हिंगे,मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदनाद्वारे यांना आज दुपारी केली.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भाजपा पदाधिकारी संजय कनोजिया,लाला खंडेलवाल,उज्वल रायबोले, मंगेश यादव,सुनील खनवानी, राजा देशमुख, डॉ महेश महाजन यांचा समावेश होता
कोरोना विषाणू च्या धास्ती मुळे जगात हाहाकार उडाला असून देशात लॉक डाऊन सुरू आहे कामठी तील नागरिकांना खायला अन्न धान्य नाही त्यामुळे सॅनिटायझर साबण मास्क खरेदीसाठी पैसे नाहीत म्हणून नगर परिषद प्रशासनाने १४ वा वित्त आयोग, नगर परिषद फँड किंवा इतर उपलब्ध निधी तुन प्रत्येक कुटूंबियांना सॅनिटायझर, साबण,मास्क ची हेल्थ किट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली निवेदनाच्या प्रती माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांना देखील पाठविण्यात आल्या