नागपूर : मकर संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाविरोधात नागपूर पोलिस विभाग आणि महानगर पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. हा मांजा बगळणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी लाखांचा मांजा जप्त केला आहे.
मकरसंक्रांत निमित्त आज शहरात ठिकठिकणी पतंगोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी सरार्स नायलॉन मांजा वापरण्यात येत असून पोलिसांनी याविरोधात आज शहरात ठिकठिकाणी धडक मोहीम सुरु केली. रेशमबाग मैदानावर पतंग तपासणी दरम्यान, फक्त २ जण पतंग उडवताना आढळले पण त्यांच्याकडे फक्त साधा बरेली मांजा (मांजा) होता. इतर सर्व पतंग छतावरून उडवत होते.तर दुसरीकडे शांतीनगर हद्दीतील उड्डाण पुलावर पोलीस विभागातर्फे तार बांधून नागरिकांचे सुरक्षे करता प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक ग्राउंडवर स्वतः पोलीस अधिकारी नागरिक उडवीत असलेल्या पतंगीच्या मांजाची तपासणी करत आहेत.
दरम्यान मकर संक्रांतनिमित्त पतंग उडवण्याचा उत्साह लहानांपासून तर मोठ्यांपर्यत सर्वांच असतो. मात्र पतंगासोबत लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी धोकादायक आहे. मकर संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. या प्रकरणी नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना नायलॉन मांजा विक्रीविरोधात सक्रिय होण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.