नागपूर : शहरातील कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
इंदिरा भारद्वाज ( वय 55) असे मृत महिलेचे नाव असून पतीने कुऱ्हाडीने वार करत तिला संपविले.तर गिरधर भारद्वाज असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी गिरधर आणि त्यांच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. तो वारंवार पत्नी इंदिरावर संशय घेत होता.आजच्या वादादरम्यान गिरधर याला राग अनावर झाला.त्याने कुऱ्हाडीने वार करत पत्नीची हत्या केली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गिरीधर भारद्वाज याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे