Advertisement
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्रजापती नगरमध्ये एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनोज बंगाली बंजारे असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी आरोपींविरोधात बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात हल्लेखोराने मनोजच्या डोक्यात मारून त्याला ठार केले.यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.