नागपूर – शहरातील सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टी भागात बुधवारी रात्री घडलेल्या चाकूहल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात सराईत गुन्हेगार सागर मसराम याचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र लक्ष्मण गोडे गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी चंदू याला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सागर मसराम व लक्ष्मण गोडे यांचा आरोपी चंदूसोबत जुना वाद होता. सागर याला पूर्वी शहरातून हद्दपारही करण्यात आले होते. बुधवारी रात्री चंदूसोबत दोघांचा वाद झाला.हा वाद चिघळला चंदूने दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर लक्ष्मणची प्रकृती चिंताजनक आहे.
याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी चंदूला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण स्थानकांमध्ये दहशत पसरली आहे.