नागपूर : शहरातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत आराधना नगरमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मयूर उर्फ रॅपर उके असे मृताचे नाव आहे. मयूर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर चोरी, घरफोडी आदी सुमारे आठ गुन्हे दाखल आहेत.
माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मयूरच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला मयूरच्या घरामागील झुडपात त्याचा मृतदेह दिसला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
मृतक तरुणाच्या घरामागे त्याचा मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी हत्येअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मयूरच्या कुटुंबात आई आणि एक लहान भाऊ आहे. काल सकाळी अकरा वाजता मयूर घरून निघाला. पैशाच्या वादातून त्याच्या मित्राने त्याचा खून करून नंतर त्याचा मृतदेह घरामागे फेकून पळ काढल्याची अफवा आहे. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.