Advertisement
नागपूर : एकिकडे शहारत दिवाळी सणाचा उत्साह साजरा केला जात असताना हत्येची घटना समोर आली आहे.इमामवाडा परिसरात शुक्रवारी रात्री, 1 नोव्हेंबर रोजी रात्री एका व्यक्तीची अज्ञातांनी हत्या केली.
राहुल वाघमारे असे मृताचे नाव आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हल्लेखोरांनी राहुलवर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
राहुलला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पुढील तपास सुरू केला आहे.