· 292 व्यक्ती संदर्भित
·868 पथके कार्यरत
भंडारा : प्रभावी कोविड-19 नियंत्रणासाठी नविन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरीत करण्यासाठी जिल्हयात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत असून आतापर्यंत 4 लाख 85 हजार 874 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यासाठी जिल्हयात 868 पथके कार्यरत आहेत. सर्व्हेक्षणा दरम्याण 292 व्यक्तींना संदर्भित करण्यात आले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य पथक घरोघरी जाउन नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. सदर पथके कुटुंबांना भेटी देउन वैयक्तिक, कोटुबिक व सार्वजनिक जीवनात प्रतिबंधत्मक खबरदारी घेण्याबाबतची त्रिसुत्री आवश्यक असल्याचे महत्व नागरिकांना या मोहिमेत पटवून देत आहेत.
तालुका निहाय सर्व्हे करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या खालील प्रमाणे
जिल्हयात को-मॉरबिड रूग्णांची संख्या 25 हजार 972 आहे. तसेच संदर्भित केलेल्या रूग्णांची संख्या जिल्हयात 67 असुन त्यापैकी 4 रूग्ण सर्व्हेदरम्यान पॉझेटिव्ह आढळले. सर्व संशयित व्यक्तिंनी कोविड-19 ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आशा कार्याकर्तीव्दारे सर्व्हेक्षणामध्ये घरांना भेटी देतांना लोकांशी संवाद साधुन सदर मोहीमेची सेल्फी काढण्यात येऊन मोहिमे संबंधी व कोविड-19 संबंधी माहिती कळविण्यात येते.
लोकप्रतिनिधी, खाजगी रूग्णालय व आशा स्वयंसेविका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेतला जात आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम कोविड-19 साठी नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्हयात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.