Published On : Wed, Jan 1st, 2025
By Nagpur Today Nagpur News

शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे अशी माझी इच्छा; प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Advertisement

मुंबई : गेल्या वर्षात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी काळात एकत्र यावे अशी प्रत्येकाची आहे.

अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी आज पंढरपूरला जावून विठुरायांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपलं कुटुंब पुन्हा एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली आहे. यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य समोर आलं आहे. जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तर माझ्या छातीत शरद पवार आहेत, असे ते म्हणाले होते.

Gold Rate
03 April 2025
Gold 24 KT 91,900 /-
Gold 22 KT 85,500 /-
Silver / Kg 98,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यातच आता आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे.शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित येणे चांगली गोष्ट आहे,असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था आहे.

भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्रच आलं तर यात काही गैर नाही. कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावं, अशी माझी सुद्धा इच्छा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो. अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले. त्यांच्या बरोबरचे संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत, असे पटेल म्हणाले.

Advertisement
Advertisement