Published On : Fri, Oct 20th, 2023

नागपुरात 2023 मध्ये 65 खुनांची नोंद ; 2022 च्या बरोबरीचा गाठला टप्पा !

Advertisement

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून हत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हे पाहता 2023 मध्ये आतापर्यंत 65 खुनांची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही संख्या 2022 मधील खुनांच्या संख्याच्या बरोबरीची आहे.

नागपूर हे केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महेरघर आहे. मात्र असे असतानाही शहरात गुन्हेगारीने डोके वर केल्याचे दिसते.2022 मध्ये शहरात एकूण 65 खूनांची नोंद झाली. सध्या महिन्याला 8 खूनांचा जणू ट्रेंडच सुरु आहे.

Advertisement

2022 च्या पहिल्या आठ महिन्यांत नागपूर शहरात 49 खून झाले, 2023 मध्ये हीच संख्या वाढून 57 वर पोहोचली. 2023 हे वर्ष हत्यांच्या घटनांसाठी दुर्दैवी ठरले. नागपूर शहरातील पाचपौली परिसरात झालेल्या खुनाने नवीन वर्षाची म्हणजेच 2023 ची सुरुवात झाली होती.

तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शहरात खुणांच्या घटनांनी नागपूर हादरले. धक्कादायक म्हणजे ऑगस्ट महिन्यात ही संख्या जवळपास दुप्पट झाली.ऑगस्ट, 2023 पर्यंत, नागपूर शहरात गेल्या वर्षीच्या याच वेळेच्या तुलनेत 7 अधिक खून झाले आहेत.

‘नागपूर टुडे’शी बोलताना, पोलिस उपायुक्त (डीसीपी) गुन्हे शाखेचे मुम्माका सुदर्शन यांनी सांगितले की, 2022 च्या तुलनेत या वर्षी ऑगस्टपर्यंत शहरात सर्वाधिक खून झाले आहेत. तथापि, डीसीपी म्हणाले की यातील बहुतांश घटना कौटुंबिक कलहामुळे घडल्या.

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिस सर्व प्रतिबंधात्मक पाऊले उचलत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक डीसीपी रात्री 1 वाजेपर्यंत रस्त्यावर गस्त घालत आहेत. आम्ही 40 हून अधिक MPDA आणि 10 MCOCA आरोपींवर लावण्यात आले.

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे गुन्हे दाखल केले जातात.परंतु या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलली जात आहेत, असे डीसीपी मुम्माका सुदर्शन यांनी सांगितले.

– शुभम नागदेवे