Published On : Fri, Jul 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विमानतळाला मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा फटका; ‘या’ चार फ्लाईट झाल्या रद्द

Advertisement

नागपूर : जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टचा सर्वर सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरासह भारतातील विमानतळावर विमान सेवा ठप्प झाली आहे. यामुळे अनेक विमानांची उड्डाण रखडली आहेत. नागपूर विमानतळालाही मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊनचा फटका बसला असून चार महत्त्वाच्या फ्लाईट रद्द झाल्या आहेत.700 पेक्षा जास्त प्रवाशांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊनमुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

‘या’ फ्लाईट झाल्या रद्द –

Today’s Rate
Thu17 Oct. 2024
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 91,700 /-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊनमुळे नागपूर – बेंगलुरु(6E-6803)फ्लाईट,नागपूर -दिल्ली (6E-2035) फ्लाईट, नागपूर- दिल्ली (6E-6573), नागपूर -मुंबई (6E-806) या फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत.

Advertisement

दरम्यान दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर अचानक डाऊन झाले. त्याचा फटका जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात बसला. मग ती बँक सेवा असो की विमानसेवा, सर्वच काही ठप्प झाले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता अचानक सर्व्हर डाऊन झाले. संगणकाची स्क्रिन अचानक निळी झाली. बघता बघता रूग्णालय, एअरपोर्ट, न्यूज चॅनेल, शेअर मार्केट सगळ्याच ठिकाणी संगणकाची स्क्रिन निळी झाली. हे फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात अनुभवायला भेटले आहे.