नागपुर: आकाशवाणी नागपुरचे कार्यक्रम पुर्वी ६०० किलोमीटर पर्यन्त ऐकू जात होते. आता ते न्यूज ऑन एयर अॅपच्या माध्यमातून जगभर पोहोचले जात आहेत. केंद्राच्या तांत्रिक सुधारणामुळे उच्च दर्जाचे कार्यक्रम ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात ऐकल्या जात असल्याचे आकाशवाणी नागपुर केंद्राचे उप महानिदेशक (अभियांत्रिकी) रमेश घरडे यांनी सांगितले.
बुधवार १९ मार्च २०२५ रोजी आकाशवाणी नागपुरच्या कृषी आणि गृह विभागातर्फे ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची त्रैमासिक बैठक आकाशवाणी नागपुर केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली.
आकाशवाणी कृषि विभागाचे कार्यक्रम अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा दृष्टिने निरंतर प्रयत्न करीत असल्याचे कार्यक्रम प्रमुख श्रीमती प्रियदर्शनी राऊत यांनी सांगीतले.
बैठकीच्या सुरुवातीला सध्या सुरु असलेल्या तिमाहातील महात्वाच्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाबाबत माहिती कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोले यांनी सादर केली. याबाबत उपस्थित विभाग प्रमुखांनी सूचना करून कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित केली.
या बैठकीला माफसूचे संचालक विस्तार अनिल भिखाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविन्द्र मनोहरे, प्रकल्प संचालक आत्मा अर्चना कडू, मुख्य वैज्ञानिक निरी गजानन खडसे, केन्द्रीय कापुस अनुसंधान संस्थाचे अर्जुन तायडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, वनविभाग अधिकारी एन आर राउत, रेशीम विकास अधिकारी अनिल ढोले, महाव्यवस्थापक एफ डी सी उत्तम सावंत एम, मत्स्य व्यवसाय अधिकारी जितेश केशवे, कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे प्रमोद पर्वते, प्रसिध्दी व माहिती अधिकारी वनविभाग संदीप गवारे, डॉ,मयूर कुमार मेश्राम कृषी विज्ञान केंद्र नागपुर , अश्विनी टेकाम मत्स्य व्यवसाय अधिकारी, एन बी एस एस एल यु पी शास्त्रज्ञ डॉ अभय शिराले, श्रीमती जयश्री परतेती कृषी अधिकारी, डॉ. श्रीमती हर्षा मेंढे उपस्थिति होते.
तिमाहातील प्रसारित होणारे कार्यक्रमाचे वाचन शांतनु ठेंगडी आणि रोहणी सूर्यवंशी नैमेत्तिक उदघोषक यांनी केले.