नागपूर : हवामान खात्याने नागपूसह विदर्भात गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 5 मे पर्यंत हा पाऊस पडणार असल्याची माहिती आहे.
बंगालच्या उपसागरात पाच ते अकरा मे दरम्यान चक्रीवादळ निर्माण होणार आहे. पाच मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात हवेतील कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणातही पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळेल, असेही हवामान विभागाने सांगितले.
नुकतीच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली आहे.यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.