नागपूर :दोन दिवसांपासून नागपुरात मुसळधार पाऊस पडत आज सकाळीही हलक्या सरींचा पाऊस पडला . शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील सर्वच भागात आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज शुक्रवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर २९ ते ३१ जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्या मुसळधार पावसाचे संकेत देण्यात आले आहे.