Advertisement
नागपूर : गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी ‘ब्रेकफास्ट’ घेतला. याचे फोटो ‘व्हायरल’ झाले आहेत. यात भाजपचे विस्तारक योजनेचे विदर्भ संयोजक देवेन दस्तुरे, नगरसेविका रुपा राय नाश्ता करताना दिसून येत आहेत.
हा फोटो ‘व्हायरल’ झाल्यानंतर दिवसभर ‘सोशल मीडिया’सह शहरातील राजकीय वर्तुळात याचीच चर्चा होती. भाजप नेतेदेखील ‘पेटपूजा’ करुनच उपोषणाला गेले. हे सोयीचेच ‘उपोषण’ होते, अशी टीका विरोधकांनी केली. तर भाजपमधील सूत्रांनी गुप्ता यांच्याकडे नेत्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याचे सांगितले.