Advertisement
नागपूर: शहरात गुन्हे शाखेच्याअंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी 3 सप्टेंबर 2024 रोजी योगेश जगतसिंग ठाकूर आणि रामकुमार मनोज पटेल या दोन आरोपींना 400 ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या. हस्तगत करण्यात आलेल्या गांजाची किंमत 8,450 रुपये असल्याचे बोलले जात आहे.
यादरम्यान करण्यात आलेल्या चौकशीत माजीद नावाच्या आणखी एका आरोपीचा अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीत सहभाग असल्याचे उघड झाले. एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपींना धंतोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी अन्य आरोपींचा शोध घेत पुढील तपास सुरु केला आहे.