Published On : Mon, Sep 3rd, 2018

नागपुरातील ‘साई’ केंद्रामध्ये मिळणार बॉक्सिंग प्रशिक्षण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर: दिवसेंदिवस बॉक्सिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे या खेळामध्ये युवकांचा सहभागही वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये देशाची पदक संख्या वाढावी यासाठी खेळाडूंना अद्ययावत सुविधा मिळणे आवश्यक आहे. नागपूरात साकारत असलेल्या १५० कोटीच्या ‘स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (साई)च्या केंद्रामध्ये बॉक्सिंगचा समावेश करून येथे बॉक्सिंग प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन, राजमार्ग व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूर महानगरपालिका, नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशातील पहिली महापौर चषक सबज्यूनिअर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. सिव्हील लाईन्स येथील राणी कोठी येथे आयोजित उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे उर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक व आयोजन समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, बसपा गटनेता मोहम्मद जमाल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक संजय महाजन, मनपा उपायुक्त रविंद्र देवतळे, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव जय कवळी, स्पर्धा निरीक्षक सी.बी. राजे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव भरत व्हावळ, भारतीय बॉक्सिंग संघाचे माजी व्यवस्थापक के.के. बोरो, अर्जुन पुरस्कार विजेते डी.एफ.आय.चे मुख्य निवडकर्ता कॅप्टन गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कार विजेते एस. जयराम, मनोज पिंगळे, राजेंद्रप्रसाद, भारतीय महिला बॉक्सिंग संघाच्या मुख्य प्रशिक्षक अमनप्रीत कौर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आय. व्यंकटेश्वर राव, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे दत्ता पंजाब, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सज्जड हुसैन, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रेम चंद, विभागीय सचिव व बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अरुण बुटे, राजेश देसाई, दादर नगर हवेली बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, अनुराग वर्मा, पारस कोतवाल, डॉ. विजय इंगोले, नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहर व जिल्ह्यात ३५० स्टेडियम उभारणार

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ग्रामिण भागातील व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुले व मुलीमध्ये चांगली प्रतिभा असते. त्यांच्यातील कौशल्याला योग्य मार्गदर्शन व योग्य सुविधांची जोड मिळाल्यास ते स्वत:सह देशाचे नाव लौकीक करू शकतात. असे खेळाडू आपल्या नागपूर शहर व जिल्ह्यातूनही घडावे यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. येत्या काळात नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ३५० स्टेडियम उभारण्याचा मानस आहे. या स्टेडियममध्ये विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नगरसेवक व आयोजन समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले. ७ सप्टेंबरपर्यंत रंगणा-या या स्पर्धेमध्ये देशातील विविध ३१ राज्यांतील सुमारे ४०० खेळाडू सहभागी झाले आहेत. खेळाडूंसह प्रशिक्षक व विविध ५५० अधिकाऱ्यांची आमदार निवास येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. सर्बिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाला रौप्य पदक मिळवून देत जगात नागपूरचे नाव लौकीक करणारी आंतरराष्ट्रीय बॉक्सर अल्फीया पठाणचे यावेळी केंद्रीय मंत्री यांनी स्वागत करून सन्मानित केले. याशिवाय स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसेडर माय एफएमचे राजन यांनाही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सन्मानित केले. यावेळी मनपाचे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, जितेंद्र गायकवाड यांच्यासह बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement