Advertisement
नागपूर: अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी शिथिल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सोमवारी देशभरातील दलित संघटना व विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. प्राप्त माहितीनुसार नागपूरमध्ये इंदोरा चौकात जमावाने सिटीबस पेटवली. सोनेगाव रेल्वे स्थानकमार्गे निघालेल्या या बसला आंदोलकांनी लक्ष केले. तर उत्तर नागपूरातील जरीपटका भागात एक मोर्चा आमदाराच्या निवास्थानाकडे कूच करत असल्याची बातमी आहे.
शहरातील इतर ठिकाणी सध्या परिस्थिती सामान्य असून कुठल्याही हिंसक घटनेची नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान काही भागात बहुजन समाज पक्ष आणि दलित संघटनांचे तुरळक मोर्चे निघाले. तर काही भागात टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला.
एकूणच सध्या नागपूर शहरातील प्रतिष्ठाने, वाहतुक व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु असल्याचे चित्र आहे.