Published On : Sat, Jul 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कॅब चालकावर शस्त्राने वार करत दाम्पत्याने कार केली लंपास !

Advertisement

नागपूर : शहरातील बेसा येथे एका दाम्पत्याने कॅब चालकावर च शस्त्राने वार करत मोबाईल तसेच कार घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री एका निर्जन ठिकाणी ‘ड्रॉप’ करण्याचे नाटक करून महिला व पुरुषाने चालकावर कॅबमध्येच शस्त्राने वार केले व त्यानंतर मोबाईल तसेच कार घेऊन पळ काढला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून जखमी कारचालकावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहे. सूरज मेश्राम (३३, अंतुजीनगर) असे कॅबचालकाचे नाव आहे. मागील दोन महिन्यांपासून ते कॅब चालवत असून त्यांनी भाडेतत्त्वावर परिचयातील एका व्यक्तीकडून कॅब घेतली आहे.

गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ते टेकडी गणेश मंदिराजवळ कॅबसह उभे असताना ब्लेझर घातलेला तरुण व एक महिला आले आणि त्यांनी बेसा चौकाजवळ जायचे आहे असे सांगितले. सूरज यांनी तीनशे रुपये भाडे होईल असे सांगितल्यावर ते तयार झाले व कॅबमध्ये बसले.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डबलडेकर उड्डाणपुलामार्गे सूरजने मनिषनगर व तेथून बेसा असे त्यांना नेले. मात्र ते नेमका पत्ता सांगत नव्हते. सूरजला संशय आल्याने त्याने घोघली मार्गावर त्यांना उतरण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने धारदार शस्त्राने सूरजच्या मानेवर वार केले. दुसरा वार करत असताना सूरजने हाताने चाकू अडविला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर पुरुषाने सूरजला कारच्या बाहेर ओढले आणि जबरन मारहाण केली.

तसेच त्याच्या जवळचे मोबाईल, दीड ते दोन हजारांची रोख व कार घेऊन दाम्पत्यानी पळ काढला. सूरजने जवळील पोद्दार शाळा गाठली व तेथील सुरक्षारक्षकाच्या मोबाईलवरून पोलिसांना माहिती दिली. सूरजच्या तक्रारीवरून अज्ञात महिला व पुरुषाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला.

Advertisement