मुंबई/नागपुर – सध्या श्रमिकांच्या गळ्यातला ताईत झालेल्या सोनू सूदच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. लॉकडाउनमध्ये मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्यासाठी सोनू त्याला शक्य ती सर्व मदत करत आहे. त्याच्या या मदत कार्याला पत्नी सोनाली आणि मुलांचीही त्याला साथ मिळाली आहे. सोनूची पत्नी सोनाली लाइमलाइटपासून दूर असते त्यामुळे तिच्याबद्दल फारसं कोणाला माहीत नाही. म्हणूनच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची आज प्रत्येकालाच इच्छा आहे. आज आम्ही तुम्हाला दोघांचं नागपुर कनेक्शन आणि त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत.
सोनू आणि सोनालीची पहिली भेट नागपुरमध्ये झालेली. वानाडोंगरी येथील यशवंतराव चव्हाण इंडीनिअरिंग कॉलेजमध्ये सोनू इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत होता. सोनाली तिथे एमबीए करत होती. सोनू सूद अस्सल पंजाबी आहे तर सोनाली तेलगू. पण दोघांच्या प्रेमात प्रांत, भाषा कधी आली नाही. पहिल्या भेटीतच दोघंही मित्र झाले. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात कसं झालं ते त्यांनाही कळलं नाही. नागपुरात त्यांच्या प्रेमाची कळी फुलली आणि बहरलीही.
कुटुंबासोबत सोनू सूद
नागपुरात धरमपेठ, सीताबर्डीत फिरणं, तिथेच सिनेमे पाहणं, शंकर नगरात ब्रेड पकोडा खाणं, कटिंग चहा घेणं त्यांना आवडायचं. अंबाझरी आणि फुटाळा तलावाकाठी सूर्यास्त पाहत प्रेमाच्या आणाभाका त्यांनी घेतल्या होत्या. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९९६ मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर इंजीनिअर होण्यापेक्षा अभिनेता होण्याची सोनूने इच्छा बोलून दाखवली. सुरूवातीला सोनालीने याला विरोध केला. मात्र त्यानंतर तिने पूर्ण पाठिंबा दिला.
…म्हणून प्रवासी महिलेने मुलाचं नाव ठेवलं सोनू सूद
लग्नानंतर दोघं मुंबईत आले आणि स्ट्रगल सुरू केलं. सोनूच्या सिनेसृष्टीतील स्ट्रगलमध्ये सोनालीने त्याला खंबीरपणे साथ दिली. हळूहळू तमिळ सिनेसृष्टीत त्याचं नाव होऊ लागलं आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्याने आपला मोर्चा वळवला. आज बी- टाउनमध्ये खलनायक म्हणून त्याची स्वतःची अशी ओळख आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्याने नागपुरला त्याच्या हृदयात वेगळं स्थान असल्याचं मान्य केलं आहे.
जेव्हाही नागपुरला यायची संधी मिळते तेव्हा कॉलेजच्या परिसराला आणि जिथे जिथे फिरायचो त्या सर्व ठिकाणांना आवर्जुन भेट देत असल्याचं त्याने अनेकदा मान्य केलं आहे. नागपुरने त्याला अनेक गोड आठवणी आणि आयुष्यभराची साथ देणारी पत्नी दिल्याचं त्याने मान्य केलं