Published On : Mon, Apr 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मध्यवर्ती कारागृह कैद्यांसाठी ‘ई-मुलाकत’ आयोजित करण्यात महाराष्ट्रात अव्वल

2024 च्या पहिल्या 3 महिन्यांत 4,293 मुलाकती केल्या आयोजित 
नागपूर: शहरातील मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांसाठी कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी ई- मुलाखत (व्हिडिओ कॉन्फरन्स) कार्यान्वित झाल्यामुळे कारागृह व पोलिस प्रशासनाची धावपळ काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. यातच नागपूर मध्यवर्ती कारागृहाने 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत आपल्या कैद्यांसाठी 4,293 ई-मुलाकत सत्रे आयोजित करून महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे.
महाराष्ट्रातील ई-मुलाकतीची एकूण आकडेवारी – 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कारागृहातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, यावर्षी जानेवारीपासून महाराष्ट्रातील ६० कारागृहांमध्ये ई-मुलाकत प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाली.एकूण 138,672 मुलाकतीपैकी 21,963 इतक्या ई-मुलाकती झाल्या आहेत. याअंतर्गत कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांसह आणि वकिलांसह एकूण बैठकीपैकी 16 टक्के आहे.
नागपूर कारागृहातून जानेवारीपासून सर्वाधिक ई-मुलाकत – 
जानेवारी महिन्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहातून एकूण 1,392 ई-मुलाकत सत्रे घेण्यात आली. फेब्रुवारीमध्ये ही संख्या 1,379 वर पोहोचली, तर मार्च महिन्यात ई-मुलाकत सत्रांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून या महिन्यात एकूण 1,522 बैठका घेण्यात आल्या.
केंद्र सरकारची योजना – 
ई-मुलाकत प्लॅटफॉर्म हे इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम (ICJS) अंतर्गत ई-कारागृह प्रणालीचा भाग आहे, 2022 मध्ये केंद्र सरकारने एकूण 3,375 कोटी रुपये खर्चून सुरू केले होते.
ICJS मध्ये नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) द्वारे याप्रणालीमध्ये समर्पित आणि सुरक्षित क्लाउड-आधारित पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
ICJS चे पाच स्तंभ आहेत ज्यात पोलिसांसाठी ई-कारागृह आणि गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग आणि नेटवर्क सिस्टम, फॉरेन्सिक लॅबसाठी ई-फॉरेन्सिक, न्यायालयांसाठी ई-कोर्ट आणि सरकारी वकिलांसाठी ई-प्रोसिक्युशन यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय कारागृह माहिती पोर्टलवर ई-मुलाकतीसाठी बुक करावी लागते अपॉइंटमेंट- 
ई-मुलाकत अंतर्गत, एक यंत्रणा देखील उपलब्ध आहे जिथे कुटुंबातील सदस्य किंवा वकील वैयक्तिक भेटीसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकतात. ई-मुलाकत आणि भेट बुकिंग या दोन्ही सुविधांचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि वकिलांना राष्ट्रीय कारागृह माहिती पोर्टलवर फॉर्म वापरून नोंदणी करावी लागेल.संपूर्ण महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये, तटबंदीच्या काचेच्या पलीकडे बसलेल्या अभ्यागतांसोबत आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली इंटरकॉमवर कैद्यांशी संवाद साधताना वैयक्तिक भेटी घडतात. तुरुंगाच्या नियमावलीनुसार, ज्यांची नावे कैद्याने सूचीबद्ध केली आहेत, असे जवळचे नातेवाईक, मित्र आणि वकील यांनाच त्याला भेटण्याची परवानगी आहे. हे नियम कारागृह कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली होणाऱ्या ई-मुलाकतीसाठीही लागू होतात.
– शुभम नागदेवे 
Advertisement