नागपूर: काही दिवसांपूर्वी नागपुरात रामझुला पुलावर मर्सडिज नशेत असलेल्या मर्सडिज कार चालक महिलेने दोन तरुणांना चिरडले.आता नुकतीच पुण्यात तशी घटना घडली. पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मध्यरात्री नशेत गाडी चालवत दोघांना चिरडले.अवघा महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले.
नागपूर शहरातही नाईट कल्चरमुळे पब आणि बार संस्कृती उदयास आली असून युवकांचा याकडे कल आहे. त्यामुळे अशा बार आणि पबवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कंबर कसली. पोलीस आयुक्तांनी शहरातील सहा पब आणि दोन बार वर कारवाईचा बडगा उचलत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्याची माहिती समोर आली. रंगोली बीअर बार आणि ग्रीन हॉटेल ॲण्ड बार अशी बारची तर डिजो द लक्झरी लाउन्ज, पॅरेडाईज पब, बॅरेक कॅफे पब, सायक्लॉन पब, एजन्ट जॅक आणि वेअर हाऊस ही कारवाई करण्यात आलेल्या पबची नावे आहेत.
शहरात रात्री उशिरापर्यंत बार आणि पब सुरू ठेऊन नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने मोठ्या अप्रिय घटनांना तोंड द्यावे लागत आहे.
पोलिस आयुक्तांनी या आठही बार आणि पबविरोधात एनडीपीएस आणि संघठीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करीत अंबाझरी, इमामवाडा, प्रतापनगर, एमआयडीसी या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे आठही बार आणि पब सील करण्यासाठी पत्रव्यवहारही सुरु करण्यात आला आहे.